आजचा प्रश्न
प्रश्न- सूंता केल्याने सेक्सला काय फायदा होतो ?
उत्तर- स्त्री-पुरुषांना सूंता करून सेक्समधे काही फायदा होत नाही. शीघ्रवीर्यपतनाला फायदा होतो असा समज आहे, परंतु असे दिसून येत नाही. अंतर्वस्त्र सतत शिश्नमुंडाला लागून तेथील त्वचेचा रंगा बदलू शकतो इतकेच. पण कोणतीही लैंगिक समस्या येत नाही किंवा लैंगिक सुखात फायदा होतो असे नाही. काही धर्मात प्रथा म्हणून आणि फिमोसीस असेल तरच सूंता करतात. काहीजण स्टाईल म्हणून सूंता करतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)