आजचा प्रश्न
प्रश्न- मी २५ वर्षांचा अविवाहित आहे. नियमितपणे दिवसातून २ वेळा हस्तमैथुन करतो. पण हस्तमैथुन केल्यावर मला शारीरिक थकवा जाणवतो. रोज हस्तमैथुन केल्याने ताकद कमी होते, असं ऐकलेलं. खरं आहे का?
उत्तर- हस्तमैथुन करणे ही स्वाभाविक क्रिया आहे. त्याने काही धोका होत नसतो. वयात येताना सतत याविषयी चुकीची माहिती मित्राकडून कानावर पडत असते. त्यात खोट्या जाहिराती आणखी मारा करत असतात. या सर्व प्रकाराने हस्तमैथुन केल्याने खरे तर चांगला व्यायामच होत असतो. पण थकवा येतो हे सतत ऐकल्याने तसेच वाटू लागते, डोळे खोल गेले असे वाटते, प्रत्यक्षात काही वाईट परिणाम झालेला नसतो हे लक्षात घ्या. एकदा त्यामागील शास्त्रीय सत्य समजले की ही सगळे लक्षणे थांबतात. इथे गरज आहे लैंगिक अवयव आणि त्याची नैसर्गिक क्रिया कशी असते हे जाणून घेण्याची. पुरुषाला असे वाटते की यावर औषधे हवेत. इथेच भोंदू लोक यावर उपाय म्हणून लाखो रुपये खर्च करायला लावतात. पण शास्त्रीय माहिती दिली की पूर्ण तक्रार नाहीशी होते, हे सत्य कोण सांगत नाही.
लोकांना दोन वेळा सेक्स केला की चांगले वाटते. पण दोनवेळा हस्तमैथुन केले की ताकद कमी होते, असे अजब विचार मनात येऊ लागतात. अशी सगळी गंमत आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)