आजचा प्रश्न

प्रश्न- आपल्या देशात थ्रीसम योग्य आहे का ?
उत्तर- थ्रीसम म्हणजे एक पुरुष आणि दोन स्त्रिया किंवा एक स्त्री आणि दोन पुरुष यांनी एकत्र सेक्स करणे. देश, रूढी, परंपरा, संस्कृती कोणतीही असो, मानवी कामजीवनात खूप विविधता पहायला मिळते. आपल्या देशात देखील हे आहे. तिघांची इच्छा असेल आणि खाजगी आयुष्यात बंदिस्त jaget ते असे करत असतील तर त्याला विरोध करता येत नाही. हे करताना काळजी घ्यावी, की त्यातून कुठला लैंगिक आजार होणार नाही. काही ठिकाणी पैसे मिळवण्यासाठी, आनंदासाठी, वेगळे काहीतरी करून बघण्यासाठी, देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसोबत हे केले जाते. फक्त उच्चवर्गीय लोकांमध्येच हे होते असे नाही. वात्सयनाच्या कामसूत्रामध्ये याचा उल्लेख आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी चार भिंतीच्या आत घडत असतात. त्या उघडकीस आल्या, की लोकांना धक्का बसतो. पण खाजगी जीवनात काहीही घडू शकते. कुणाच्या दबावाखाली हे करता येणार नाही वा करूही नये. भारतातील काही जोडपे जे परदेशात राहतात, त्या स्त्रीवर तिच्या पतीकडून थ्रीसमसाठी जबरदस्ती केली म्हणून घटस्फोट झालेल्या केसेस आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)