आजचा प्रश्न
प्रश्न- गुप्तरोग झाल्यामुळे व्यक्तीला लैंगिक समस्या निर्माण होते का?
उत्तर- गुप्तरोगामुळे गंभीर अशी लैंगिक समस्या होत नाही. पण लैंगिक अवयवाला खाज येणे, वेदना होणे, जखम होणे, ताप यामुळे सेक्सची इच्छा कमी होणे, ताठरता जाणे अशा समस्या जाणवतात. गुप्तरोग बरा झाला की लैंगिक अवयव परत नीट काम करू लागतात. शरीरावर गुप्तरोगाचे काही डाग उठले असतील तर त्याने काहींना शरीर उजेडात बघून काम इच्छा होत नाही. असे वेगळे परिणाम दिसतात. त्वचारोग आणि लैंगिक समस्यातज्ञांना भेटून सल्ला घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)