आजचा प्रश्न
प्रश्न- माझ्या पत्नीला सेक्समध्ये जरा देखील रुची नाही. योनी कोरडी असते काय उपाय?
उत्तर- मानसिक आणि शारीरिक कारणांमुळे या समस्या येतात. सम्प्रेरकांमध्ये दोष असणे (तरुण स्त्रीमध्ये याचा कमी चान्स), सेक्सला घाण म्हणणे, सेक्स फक्त पुरुषांसाठी असतो, सेक्स तामस आहे, देव-धर्माचा पगडा, नग्नतेला टोकाचा विरोध अशा संस्कारात वाढलेली स्त्री या अडचणी ओढवून घेतात. उपचाराला अवघड अशी समस्या आहे. दोघांनी जिद्दीने तज्ञ डॉक्टरचा सल्ला मार्गदर्शन घ्यावा. मलम, तेल, कॅप्सूल, पेपर, नेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका. उपचाराला स्त्री लाजली तर परिस्थिती अजूनच बिकट होते. उपचाराला वेळ लागतो. स्त्री समलिंगी असणे हे देखील एक कारण आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)