आजचा प्रश्न
प्रश्न- काही जण ४५ मिनिटे ते एक तास स्टॅमिना टिकतो असे म्हणतात ते कसे?
उत्तर- असे म्हणणारे काही लोक खोटे सांगतात. त्यांना बढाया मारण्याची सवय असते. काहींना वीर्यपतन फार उशीराने होण्याची समस्या असते. काहींना मानसिक आजारावरील उपचार कित्येक दिवस सुरु असतो, ज्याच्या साईड इफेक्टने लवकर पतन होत नाही. इथे एक लक्षात घेतले जात नाही ते म्हणजे... पुढील पार्टनरची इच्छा. काही स्त्रियांना देखील हे आवडत असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण इच्छेविरुद्ध इतका वेळ होत असेल तर तो त्या स्त्रीला बलात्कार वाटू शकतो. शीघ्रपतनवर allopathy औषध घेऊन सेक्सचा कालावधी वाढवता येतो. त्यात काही वेळा खरेच असा वेळ वाढतो, तरी देखील प्रत्येक पुरुषांमध्ये इतका वेळ वाढेलच असे नाही. खरे तर कुणीही दुसऱ्याच्या सेक्स लाइफशी तुलना करू नये. लोकांना याविषयी सत्य माहीत नसल्याने 'सेक्स स्टॅमिना' यावर पुरुषांना अक्षरशः लुटले जाते. सर्वांना कामजीवनाचे योग्य ज्ञान अपेक्षित.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)