आजचा प्रश्न

प्रश्न- मी २२ वर्षीय अविवाहित पुरुष आहे. माझ्या लिंगाची पुढची त्वचा मागे जात नाही. त्यामुळे मला हस्तमैथुन करताना त्रास होतो आणि ते व्यवस्थित होत नाही. मी जर सेक्स टॉयचा वापर केला तर माझी त्वचा मागे सरकेल का?

उत्तर- लिंग शिथिल अवस्थेत असताना लिंगावरील त्वचा मागे पुढे करण्यासाठी प्रयत्न करून देखील होत नसेल तर लुब्रिकेटेड मलम लावून त्वचा हळूवारपणे मागे-पुढे करता येते का हे पहावे. सौम्य ते मध्यम प्रकारचे फिमोसिस हे बरे होईल, पण सेक्स टॉय वापरून ही समस्या दूर होत नाही. उलट स्त्रीयोनी सारखे सेक्स टॉय वापरले तर लिंगावरील त्वचा फाटू शकेल किंवा जोरात मागे जाऊन लिंगावर घट्ट बसेल. मूत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)