आजचा प्रश्न
प्रश्न- नपुंसक व्यक्ती बाप बनू शकतो का?
उत्तर- नपुंसकता म्हणजे लिंगाला कडकपणा न येणे किंवा आलेली टिकवता न येणे. आणि वंध्यत्व म्हणजे वीर्य सदोष असल्याने पिता बनू न शकणे. म्हणजे नपुंसकता आणि वंध्यत्व या वेगवेगळ्या समस्या आहेत. तरी एकाच व्यक्तीत दोन्ही समस्या एकाच वेळी असू शकतात. आणि पूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या काळात देखील होऊ शकतात. नपुंसकता असलेल्या पुरुषामध्ये वीर्य नॉर्मल असेल तर तो व्यक्ती लिंग ताठरता येणारे औषध घेऊन, सेक्स करून पिता बनू शकतो. पण ताठरता चांगली आहे आणि वीर्य सदोष आहे तर तो सेक्स चांगला करेल पण बाप होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याला नक्की काय समस्या आहे ते सविस्तर माहिती विचारून समजते. बोलीभाषेत हे दोन्ही शब्द कुठेही वापरले जातात यातून गैरसमज, वाद वाढतात.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)