आजचा प्रश्न
प्रश्न- विवाह ठरवताना मॅट्रिमोनिअल ऍप हे सुरक्षित आहे की नेहमीची पद्धत योग्य ?
उत्तर- दोन्हीमध्ये पुढील व्यक्तीविषयी खरीच माहिती आपल्याला प्राप्त होईल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तरी सध्या तरुणांमध्ये अशा ऍपचा वापर करून स्थळ पाहणे याला महत्व दिले जाते. यामध्ये हे लक्षात घ्यावे की आकर्षक जाहिरात करून तुम्हाला भुरळ पाडली जाते. त्यातले प्रत्येक स्थळ हे खरी माहिती पोस्ट करते असे नाही. मोठा पगार, परदेशी कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर, पैसेवाला अशा गोष्टींना प्राधान्य दिले जाते. माझ्या पाहण्यात असे आले आहे की काही पुरुष मानसिक रोगाने ग्रस्त आहेत, समलिंगी आहेत किंवा त्यांना गंभीर लैंगिक समस्या आहेत. मुलाच्या घरातील लोकांना ही समस्या माहीत असताना लग्न लावून दिले आहे. खास त्यासाठी मॅट्रिमोनिअल ऍपचा वापर केला गेला आहे. थोडक्यात फसवणूक टाळण्यासाठी सर्व बाजूने विचार करून पाऊल टाकावे. समाज अजूनही लग्नानंतर सेक्सविषयी गंभीरपणे चर्चा, विचार करत नाही. नंतर पितळ उघडे पडते आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या ओळखीने माहिती काढणे बऱ्यापैकी चांगले. तरी १००% खात्री दोघांमध्येही देता येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)