आजचा प्रश्न
प्रश्न- वेगवेगळे लैंगिक आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी ?
उत्तर- असुरक्षित संबंध करून वेगवेगळ्या गुप्तरोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. पुढील व्यक्ती आजाराने पीडित आहे की नाही, हे त्याला नुसते पाहून समजत नसते. त्यामुळे पार्टनरचा लैंगिक इतिहास, त्याचे लैंगिक आरोग्य याचा अंदाज करता येत नाही किंवा घाईघाईत तपासणी केली जात नाही. बरेचसे गुप्तरोग योग्य प्रतीचा कंडोम नियमित वापरला तर टाळता येतात. यामध्ये दोघेही एकमेकांना सहज फसवू शकतात, हे विसरू नये. एका निरोगी व्यक्तीबरोबर सेक्स करणार असाल तर प्रोब्लेम नाही. पण अनेक व्यक्तींबरोबर करणार असाल तर फक्त आणखी एका निरोगी व्यक्तीबरोबर सेक्स आनंद घेता येईल. खरेतर सर्वांना हे शक्य होईल असे नाही. गुप्तरोग, HIV टाळण्यासाठी कंडोम नियमित वापरणे, चुंबन टाळणे (हे अवघड असते), लैंगिक स्त्राव एकमेकांना लागू नये याची खबरदारी घेणे, हे पाळावे. हे नियम किती पाळता येतील शंका आहे. आजाराची भीती वाटत असेल तर असे संबंध ठेऊ नये.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)