आजचा प्रश्न
प्रश्न- गे व्यक्तीला रात्री झोपेत ताठरता येते का ?
उत्तर- पुरुषाला रात्री झोपेत, पहाटे लिंगाला ताठरता येणे हे निरोगी लिंगाचे लक्षण आहे. त्या पुरुषाची लैंगिक आवड निवड कोणतीही असो त्याचा रात्री येणाऱ्या ताठरतेशी संबंध नाही. गे व्यक्ती हे विरुध्द लिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा असा नसतोच. लिंग, आकार ताठरता, वीर्यपतन सर्व सारखेच असते. तसेच लिंगाचे इतर कार्य देखील सारखेच असते. हेट्रो किंवा होमो दोघांमध्ये रात्री, पहाटेची ताठरता येणे बंद झाले किंवा कमी झाले की नपुंसकता मागील काहीतरी शारीरिक कारणे असण्याची शक्यता अधिक असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)