आजचा प्रश्न
प्रश्न- पुणे शहरात ऑनलाईन सेक्स टॉयचा खरेदी/वापर वाढल्याची बातमी वाचण्यात आली. हे योग्य की अयोग्य?
उत्तर- लैंगिक इच्छा वाढल्यावर हस्तमैथुन, सेक्स करून इच्छा शमवणे हे पर्याय असतात. प्रत्येकाला काही कारणास्तव सेक्स पार्टनर मिळेलच असे नाही. त्यामुळे हस्तमैथुन या निर्धोक मार्गाने कामपूर्ती मिळवण्यासाठी सेक्स टॉयचा वापर करतात. याला विरोध करणाऱ्यांना वास्त्यायन कामसूत्रबद्दल माहिती नाही किंवा त्यांना सत्य जाणून घ्यायचे नाही असे दिसते आहे. लैंगिक खेळणीचा उल्लेख कामसूत्रात आहे. असुरक्षित संभोगसुख घेऊन काही आजार होण्यापेक्षा सेक्स टॉयचा वापर हा अत्यंत चांगला आहे. उलट लैंगिक आणि मानसिक सुख मिळण्यासाठी सेक्स टॉयज्, सेक्स डॉल याचा स्वीकार करावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)