आजचा प्रश्न
प्रश्न- पहिल्यांदा सेक्स करताना कोणत्या समस्या आल्या की त्याचे काही दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?
उत्तर- सेक्सची इच्छा नसणे, नपुंसकता, शीघ्रपतन, स्त्री योनीमार्गात वेदना, स्त्री योनीमार्ग आकुंचन पावल्याने सेक्स करताच न येणे, पुरुषाची शिश्नमुंडा जवळील शीर तुटणे यापैकी काहीही होऊ शकते. हे घडले की खूप घाबरणारे जोडपी मानसिक धक्क्यात जाऊ शकतात. अगदी आयुष्य संपवण्यापर्यंत निर्णय घेतात. खरे तर शीर तुटणे हा प्रकार सोडला तर बाकीची कायमस्वरूपी अशी समस्या नसते. प्रत्येकांवर उपचार असतो. डॉक्टरी सल्ला मार्गदर्शन लगेच घेणे हे महत्त्वाचे असते. काही लोक पेपरमधील, ऑनलाईन जाहिरातीला बळी पडतात आणि वेळ वाया घालवतात. नपुंसकता कायमस्वरूपी समस्या असेल आणि स्त्री-पुरुष पैकी एक समलिंगी असणे ही कारणे देखील समस्या निर्माण करतात. हळवा माणूस जास्त त्रास करून घेतो. सततच अशा समस्या आल्या की मोठी अडचण असते. पण कामजीवनाचा अभ्यास असेल तर या समस्या जवळजवळ येत नाहीत. सेक्स चांगला अनुभवता येतो. काहीही असो समस्या आली की तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)