आजचा प्रश्न
प्रश्न- वीर्यवृद्धीसाठी कोणते उपचार किंवा औषधे, व्यायाम प्रकार आहेत?
उत्तर- कोणत्या कारणाने वीर्यामधील शुक्राणूंमध्ये दोष झाला आहे ते शोधून त्या प्रमाणे उपचार करावा लागतो. व्हिटॅमिन बी, ई, zinc हे उपयोगी ठरते असे दिसून आले आहे. पण निव्वळ त्याचे सेवन केले म्हणजे वीर्य वृद्धी होते असे नाही. पुरुषांना वाटते की बाप होण्यासाठी खूप प्रमाणात विर्य मात्रा असावी लागते. खरे तर दीड ते पाच मिली उत्तम प्रतीचे वीर्य असावे. खूप मात्रा असून जर त्यात शुक्राणूंची पळण्याची क्षमता, संख्या, रचना चांगली नसेल तर निव्वळ मात्रा चांगली असून उपयोग नसतो .मुत्ररोग तज्ञ ,स्त्रीरोग तज्ञ, अँड्रॉलोजिस्ट यावर उपचार करतात.तपासणी करून वीर्य योग्य आहे की नाही ते ठरवावे. स्वतःच ठरवणारे बरेच पुरुष आहेत. तसे करु नये. डॉक्टरांचा सल्ला अपेक्षित. विर्यदोष निर्माण करण्याला कारणीभूत पुढील गोष्टी आहेत.. लठ्ठपणा, खूप मानसिक ताण, काही औषधाचा दुष्परिणाम, व्यसनाधिनता, वृषणग्रंथीचे हैड्रोसील, व्हेरीकोसील, रक्तातील संप्रेरकांच्या पातळीतील कमी अधिकपणा, जन्मजात वृषणग्रंथी मधील विकृती.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)