आजचा प्रश्न

प्रश्न- एकदा सेक्स केल्यावर लिंग शिथिल का होते ?
उत्तर- योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी, हस्तमैथुन करताना ताठरलेल्या लिंगाची गरज असते. पुरुषामधे वासना वाढल्यावर लिंगातील तीन नळ्यांमधे रक्त वाढते व लिंग कडक होते, मोठे होते. ही ताठरता वीर्यपतन होईपर्यंत टिकते. वीर्यपतन झाल्यानंतर लिंगात साठलेले रक्त नळ्यांमधून पुन्हा मागे पाठवले जाते आणि लिंग पुन्हा शिथिल होते. ही नैसर्गिक क्रिया आहे. या अवस्थेत लिंगात आवश्यक तेवढे थोडे रक्त असतेच. पुन्हा ताठरता येण्यासाठी स्त्रीचा कामुक स्पर्श, कामवासना, दोघांची इच्छा, शारीरिक तयारी हे आवश्यक असते.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)